Home महत्वाच्या बातम्या भास्कर जाधवांच्या घरावरील हल्लाबाबत नितेश राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

भास्कर जाधवांच्या घरावरील हल्लाबाबत नितेश राणेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम

उद्धव ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील घरावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यांच्या घराच्या परिसरात दगडं, स्टम्प आणि काचेच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या राजकीय वर्तुळात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. अशातच आता भाजपा आमदार नितेश राणेंनी भास्कर जाधव यांच्यावर निशाणा साधलाय.

भास्कर जाधव तोंड सुटल्यासारखे सगळीकडे बोलत आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, नारायण राणे यांना मानणारा महाराष्ट्रात फार मोठा वर्ग आहे. या नेत्यांवर तुम्ही पातळी सोडून बोलायला लागलात, तर त्या त्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांचा राग अनावर होणारच ना?” असं नितेश राणे म्हणाले आहेत.

हे ही वाचा : रोहित पवार म्हणाले, विरोधकांचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव, यावर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“आता तुम्हाला कुणावर राजकीय टीका करायची असेल, तर राजकारणापुरतेच बोला. तुम्ही खालच्या पातळीवर जाऊन बोलाल, तर कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने प्रतिक्रिया देणारच. कुणाकुणाला थांबवणार तुम्ही? भास्कर जाधवांना जर बोलण्याची एवढी सवय आहे, तर या सगळ्या गोष्टींची सवयही त्यांनी ठेवली पाहिजे. राणेंना मानणारा वर्ग गप्प कसा बसणार? आम्ही तरी कार्यकर्त्यांना किती सांगणार?” असंही नितेश राणेंनी म्हटलं आहे.

दरम्यान, हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची शक्यता लक्षात घेता भास्कर जाधव यांच्या घरावर पोलीस बंदोबस्तदेखील वाढवण्यात आला आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

शिंदेंसोबत गेलेले अनेक आमदार उद्धव ठाकरेंकडे पुन्हा येणार?; सुषमा अंधारेंच्या वक्तव्याने खळबळ

आमदार संजय शिरसाट यांच्या प्रकृतीबाबत, डाॅक्टरांनी दिली ‘ही’ मोठी अपडेट, म्हणाले…

“राष्ट्रवादीची यशस्वी खेळी; भाजपच्या ‘या’ नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”