आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : भाजप आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला आहे. त्यामुळे नितेश राणेंसह केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनाही मोठा धक्का बसला आहे.
हे ही वाचा : शरद पवार म्हणाले, माझ्या एका वाक्यामुळे शिवसेना-भाजपमधील अंतर वाढलं; चंद्रकांत पाटील म्हणतात…
कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या जीवघेण्या चाकू हल्ल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी नितेश राणेंना अटक करा, अशी मागणी केली होती. यानंतर राणेंनी कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी वकिलामार्फत अर्ज केला होता. मात्र कोर्टानं राणेंचा जामीन अर्ज फेटाळत राणेंना धक्का दिला आहे.
कणकवली येथे शिवसैनिक संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणात नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला आहे. मात्र, असं असलं तरी नितेश राणे आता उच्च न्यायालयात जाण्याची शक्यता आहे. नितेश राणे यांच्या वकिलांकडून तशी माहिती देण्यात आली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“…अन्यथा आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्या”; एसटी कर्मचाऱ्यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी
भाजपच्या ‘या’ निलंबित आमदाराने लग्न समारंभात केला भन्नाट डान्स; व्हिडीओ प्रचंड व्हायरल