आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : एकनाथ शिंदे गट आणि भाजपमध्ये युती झाल्यानंतर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर विरोधात राणे यांच्यातील वाद काहीसा कमी होताना दिसत आहे. तसेच आगामी निवडणुकांसाठी एकमेकांवरचे आरोप-प्रत्यारोप देखील कमी झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी भाजप नेते नितेश राणे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना हिंदुहृदयसम्राट असं संबोधलं होतं. यावर दीपक केसरकरांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : “शिंदे गटातील 17 आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात, लवकरच मातोश्रीवर परतणार”
हिंदुहृदयसम्राट फक्त एकच आहेत. ते कुणीही बदलण्याचा प्रयत्न करू नयेत., असं दीपक केसरकरांनी यावेळी स्पष्टच सांगितलं.
महाराष्ट्राच्या दृष्टीने हिंदुहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरेच आहेत. ते त्यांना जनतेनं दिलेलं पद आहे. ते पद त्यांच्यासाठी योग्य आहे. त्यांची ओळखच तशी आहे. त्यांची शिवसेना ही आमची शिवसेना आहे. त्यांची हिंदुत्वाची संकल्पना वेगळी होती. हिंदुस्थानवर प्रेम करणारा प्रत्येक जण हिंदु ते मानत असतं, असं केसरकरांनी यावेळी ठणकावून सांगितलं.
महत्त्वाच्या घडामोडी –
“एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला दणका; तब्बल ‘इतके’ नगरसेवक शिंदे गटात करणार प्रवेश?”
मोठी बातमी! भ्रष्टाचार प्रकरणात भाजपचा ‘हा’ बडा नेता ईडीच्या रडारवर
आशिष शेलार शरद पवारांच्या भेटीसाठी ‘सिल्व्हर ओक’वर पोहोचले, पण…