मुबंई : करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्री यांनी वेळोवेळी काही निर्णय घेतले. यावर अभिनेता रितेश देशमुख याने मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं, यावरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी रितेश देशमुख यांच्यावर निशाणा साधला आहे.
पहिलं म्हणजे भाऊ त्याच मंत्रिमंडळात असल्यावर हे बोलावं लागतं आणि दुसरं, फिल्मी लोकं जो मुख्यमंत्री होतो त्याचं कौतुक का करतात आम्हाला चांगलं माहीत आहे… लोकांना खरी परिस्थिती दिसतेय, असं निलेश राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, आपण सगळेजण एका अभूतपूर्व संकटाला तोंड देत आहोत. करोना विषाणूबरोबरच आपण भीती, चिंता आणि अनिश्चिततेविरुद्ध देखील लढा देत आहोत. अशा काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अत्यंत स्पष्टपणे आणि जिव्हाळ्यानं आपल्याशी नियमिपणे संवाद साधत आहेत. त्यांचं यासाठी आपण कौतुक केलं पाहिजे, असं म्हणत अभिनेता रितेश देखमुख यांन उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.
पहिलं म्हणजे भाऊ त्याच मंत्रिमंडळात असल्यावर हे बोलावं लागतं आणि दुसरं, फिल्मी लोकं जो मुख्यमंत्री होतो त्याचं कौतुक का करतात आम्हाला चांगलं माहीत आहे… लोकांना खरी परिस्थिती दिसतेय. https://t.co/7SpzKdcRF1
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 27, 2020
महत्वाच्या घडामोडी-
…असा उपदेश मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांना केला तर बरं होईल- आशिष शेलार
…म्हणून आपण मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं पाहिजे- रितेश देशमुख
धान्य वाटपावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच विरोधकांना उत्तर; म्हणाले…
मुख्यमंत्र्यांनी मानले नितीन गडकरींचे आभार, म्हणाले…