संज्याला रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड द्यायला पाहिजे- निलेश राणे

0
170

मुंबई : भाजपचे नेते निलेश राणे यांनी ‘संज्याला रड्या ऑफ द ईयर अवॉर्ड द्यायला पाहिजे’ असं म्हणत शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला.

तिसऱ्या रांगे वरून पाचव्या रांगेत बसवला म्हणून परत रडायला लागला. 2019 चा “रड्या ऑफ द ईयर अवार्ड” संज्यालाच दिला पाहिजे. मी कुठे बसतो त्यापेक्षा त्या पदाचा उपयोग देशाला कसा होईल हा विचार पाहिजे पण याचं राजकारण म्हणजे मी, मला आणि मीच, अश्या अशयाचं ट्वीट निलेश यांनी केलं आहे.

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शिवसेना एनडीएतून बाहेर पडल्याची घोषणा केली. तसंच त्यांची आसनव्यवस्था विरोधी बाकावर करण्यात आली. यामुळे राऊत यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, तिसऱ्या रांगेतून पाचव्या रांगेत माझी आसनव्यवस्था करणे हे धक्कादायक आहे. कुणी तरी जाणीवपूर्वक शिवसेनेच्या भावना दुखावण्यासाठी, आमचा आवाज दडपण्यासाठी हा प्रकार करत आहे, असा आरोप राऊत यांनी केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here