मुंबई : अमेरिकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत जो बायडन यांनी बाजी मारली आहे. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी जो बायडन यांना शुभच्छा देत असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल अशी अपेक्षा आहे, असं म्हणत म्हटलं होतं. यावरुन भाजपनेते निलेश राणे यांनी रोहित पवारांवर टीका केली आहे.
मूर्खपणाचा कळस आहे, डोनाल्ड ट्रम्प भाजप तून उभा होता की काय?, सत्ताधारी आमदारांना, मंत्र्यांना महाविकास आघाडी सरकारमध्ये काही कामचं राहिला नाही असं वाटतं, असं म्हणत निलेश राणेंनी रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला.
फालतूगिरी बंद करा, सत्तेत आहात, लोकांची कामं करा. अमेरिकेत झालं, आता बिहारमध्ये अपेक्षा, आसा टोलाही निलेश राणेंनी यावेळी लगावला आहे.
मूर्खपणाचा कळस आहे, डोनाल्ड ट्रम्प BJP तून उभा होता की काय??? सत्ताधारी आमदारांना, मंत्र्यांना MVA सरकारमध्ये काही कामचं राहिला नाही असं वाटतं. फालतूगिरी बंद करा, सत्तेत आहात, लोकांची कामं करा.
अमेरिकेत झालं, आता बिहारमध्ये अपेक्षा; https://t.co/htkEj023AJ
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 8, 2020
महत्वाच्या घडामोडी-
अर्णब गोस्वामींच्या जिवाला धोका निर्माण झाल्यास महाविकास आघाडी सरकार जबाबदार- नारायण राणे
असाच बदल बिहारच्या निकालातही दिसेल- रोहित पवार
रामदास आठवले कोरोनामुक्त; शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी
जो बायडन अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष; डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव