आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : सध्या राज्यसभा निवडणुकीची धामधूम सुरु आहे, त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपला आपापल्या आमदारांची फाटाफुट टाळण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून आपल्या आमदारांची विशेष काळजी घेतली जात आहे.
सुरुवातीला शिवसेनेच्या आमदारांना मुंबईतील विधानभवनानजीकच्या ट्रायडंट हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार होते. मात्र, तिथे भाजप आमदारांचाही मुक्काम असल्याची माहिती कळताच शिवसेनेने हे हॉटेल बदलले. यावरून भाजप नेते नीलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय.
हे ही वाचा : BMC निवडणुकीच्या तोंडावर डॅशिंग नितीन नांदगावकर यांच्यावर शिवसेनेने सोपविली ‘ही’ मोठी जबाबदारी
स्वतःच्याच आमदारांवर इतका अविश्वास दाखवणारा महाराष्ट्राचा पहिलाच मुख्यमंत्री असेल. निवडणुका येतील व जातील पण असा घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परवडणार नाही, असं नीलेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, मुख्यमंत्र्याचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही ते सरकार कसं चालत असेल हे वेगळे सांगायची गरज नाही, असा टोलाही नीलेश राणेंनी लगावला.
स्वतःच्याच आमदारांवर इतका अविश्वास दाखवणारा महाराष्ट्राचा पहिलाच मुख्यमंत्री असेल. निवडणुका येतील व जातील पण असा घाबरणारा मुख्यमंत्री महाराष्ट्राला परवडणार नाही, ज्या मुख्यमंत्र्याचा स्वतःच्या आमदारांवर विश्वास नाही ते सरकार कसं चालत असेल हे वेगळे सांगायची गरज नाही. https://t.co/ahfccrvjrm
— Nilesh N Rane (Modi ka Parivaar) (@meNeeleshNRane) June 7, 2022
महत्वाच्या घडामोडी –
बॅग भरून जेलमध्ये जायला ही काही सहल नाही; अनिब परब यांचं किरीट सोमय्यांना जोरदार प्रत्युत्तर
राष्ट्रवादीचा भाजपाला मोठा धक्का; भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
मी रात्री 12 वाजता अमित शहांना फोन केला आणि सांगितलं…; संजय राऊतांचा खुलासा