आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं नवी नियमावली जारी केली असून राज्यात सकाळी जमावबंदी, तर रात्री 11 ते पहाटे पाच पर्यंत रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
अशी असेल आजपासून नवी नियमावली :
- लग्न समारंभासाठी जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती
- अंत्यविधीसाठी जास्तीत जास्त 20 लोकांची उपस्थिती
- सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय कार्यक्रमांसाठी जास्तीत जास्त 50 लोकांची उपस्थिती
- शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद. मात्र 10 वी, 12वीचे वर्ग सुरु राहणार. तसंच शाळेतील प्रशासकीय कामे सुरु राहणार.
- स्विमिंग पूल, जीम, स्पा, वेलनेस सेंटर्स आणि ब्यूटी सलून बंद राहणार
- हेअर कटिंग सलून 50 टक्के उपस्थितीत सुरु राहणार, सलूनमध्ये कोरोना नियमांचे काटेकोर पालन आणि कामगारांना लसीचे दोन्ही डोस बंधनकारक, रात्री 10 पर्यंतच परवानगी
- मनोरंजन पार्क, प्राणी संग्रहालय, म्युझियम बंद राहणार
- चित्रपटगृहे, नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरु राहणार
- तारीख जाहीर झालेल्या सर्व परीक्षा होणार
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) January 8, 2022
महत्वाच्या घडामोडी –
कोरोनाचा विषाणू नष्ट करण्यासाठी पुणेकरांने बनवलं अजब यंत्र
खुर्चीत गांजा मारून कोणालाही बोलता येते, पण…; शिवसेनेचा किरीट सोमय्यांवर निशाणा
विद्या चव्हाण-अमृता फडणवीसांच्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…