आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
कोलकाता : आज भारत विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात रोमहर्षक झालेल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा 8 धावांनी पराभव केला.
वेस्ट इंडिजनं टाॅस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 विकेट गमावत 186 धावा केल्या. भारताकडून विराट कोहली व रिषभ पंतने प्रत्येकी 52 धावांची खेळी केली. विराटने आपल्या खेळीत 7 चाैकार व 1 षटकार लगावला. तर पंतने 7 चाैकार व 1 षटकार लगावला. तर वेस्ट इंडिजकडून रोस्टन चेजने 3, तर शेफार्ड व काॅट्रेलने 1 विकेट घेतली.
हे ही वाचा : कोलईत शिवसैनिक जमले होते, पण त्यांनी मला पुण्यासारखं मारलं नाही- किरीट सोमय्या
दरम्यान, धावांचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ 20 षटकात 3 विकेट गमावत 178 धावाच करू शकला. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरन व रोवमॅन पाॅवेलची झुंजार शतकी भागीदारी व्यर्थ ठरली. पूरनने 41 चेंडूत 62 धावांची आक्रमक खेळी केली. तर पाॅवेलने 36 चेंडूत 68 धावांची नाबाद विस्फोटक खेळी केली. तर भारताकडून भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल व रवी बिष्णोईने प्रत्येकी 1 विेकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी –
“राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं हाती बांधलं घड्याळ”
“रन मशिन कोहलीनं वेस्ट इंडिज गोलंदाजांना धु-धु धुतलं, बॅटनं टीकाकारांची तोंडं केली बंद”
आदित्य ठाकरे यांचं मानसिक संतुलन बिघडलंय; भाजपच्या ‘या’ नेत्याची टीका