Home महाराष्ट्र अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी पेरली असावी; बाळासाहेब थोरातांचा दावा

अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी पेरली असावी; बाळासाहेब थोरातांचा दावा

मुंबई : काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नाराजीवर आता काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

सार्वजनिक बांधकाम खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव आपल्याला न विचारता मंजुरीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मांडल्यांने, अशोक चव्हाण नाराज आहेत. अशोक चव्हाण यांनी कडक शब्दात मुख्यमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त केली. याबाबत बोलताना अशोक चव्हाणांच्या नाराजीची बातमी कदाचित पेरली असेल, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

दरम्यान, महाविकास आघाडी किमान समान कार्यक्रमवर बनलेली आहे. सरकारचे काम चांगल्या पद्धतीने सुरु आहे. आम्ही पुढे व्यवस्थित काम करु. विरोधी पक्ष त्यांचे आमदार आश्वासक वाटावे यासाठी विरोधी पक्षनेते काम करतात. आम्ही थोडी एकमेकांची काळजी घेतली पाहिजे, मग सरकारमध्ये अडचण येणार नाही, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

… तो वृक्ष वाचला, आदित्य ठाकरेंच्या पत्राची नितीन गडकरींनी घेतली दखल; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

… तो वृक्ष वाचला, आदित्य ठाकरेंच्या पत्राची नितीन गडकरींनी घेतली दखल; दिले ‘हे’ महत्वाचे आदेश

“महाराष्ट्राला जगातील सर्वोत्तम आरोग्य सुविधा असलेलं राज्य बनविणार”

उदयनराजेंच म्हणणं बरोबर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांवर राजकारण करणं योग्य नाही- जयंत पाटील