मुंबई : मराठा समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर राज्यातील राजकारणही तापताना दिसत असून, छत्रपती संभाजीराजे यांनीही मराठा आरक्षणावरून राज्य सरकारला इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर मराठा समाजाची नाराजी दूर करण्यासाठी ठाकरे सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील मराठा विद्यार्थी आणि नोकरीसाठी पात्र उमेदवारांना 10 टक्के ईडब्ल्यूएस प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे.
मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशात 10 टक्के आरक्षणाचा लाभ मिळणार आहे. त्याबरोबर सरळ सेवा भरतीत ही मराठा उमेदवारांना आरक्षणाचा 10 टक्के लाभ घेता येणार आहे. राज्य सरकारनं तसा शासन निर्णय जारी केला आहे.
दरम्यान,राज्य सरकारने याबद्दलचा आदेश आज काढला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शिक्षण आणि नोकऱ्यांमधील मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजाला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून केला जात असल्याचं बोललं जात आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट
“नवी मुंबईत भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा मनसेत प्रवेश”
“नवी मुंबईत भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्याचा मनसेत प्रवेश”
“…मग राज्याच्या मुख्यमंत्री म्हणून माझ सरकार काय करणार आहे याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यावं”