मुंबई : कोरोनाच्या वाढत्या थैमानामुळेे राज्यातील स्थिती खूप बिकट होत चालली आहे. याच पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली प्रशासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.
अशी असेल नवी नियमावली :
1) किराणा दुकाने सकाळी 7 ते 11
2) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी 7 ते 11
3) भाजीपाला विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी 7 ते 11
4) फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी 7 ते 11
5) अंडी, मटण, चिकन, मासे विक्री सकाळी 7 ते 11
6) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी 7 ते 11
7) पशूखाद्य विक्री सकाळी 7 ते 11
8) पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल /डिझेल/ सीएनजी/ एलपीजी गॅस विक्री सकाळी 7 ते 11
9) पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार
* हॉटेल, रेस्टॉरंट, बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलिव्हरी चालू राहील.
* धार्मिक स्थळे पूर्णतः बंद राहतील.
* आठवडे बाजार पूर्णतः बंद राहतील.
* भाजीपाला/फळे बाजार बंद राहतील फक्त व्दार वितरणास मान्यता राहील.
* दारू दुकाने पूर्णतः बंद राहतील.
* टॅक्सी, कॅब, रिक्षा फक्त अत्यावश्यक सेवेकरिता चालू राहील.
* चारचाकी खाजगी वाहने फक्त अत्यावश्यक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
* दोनचाकी वाहने फक्त दोन व्यक्तींना अत्यावश्यक सेवेकरिता वापरास परवानगी राहील.
* सर्व खाजगी कार्यालये पूर्णतः बंद राहतील.
* कटिंग सलून, स्पा, ब्युटी पार्लर पूर्णतः बंद राहतील.
* शैक्षणिक संस्था, सर्व खाजगी शिकवणी वर्ग पूर्णतः बंद राहतील.
* स्टेडियम, मैदाने पूर्णतः बंद राहतील.
* विवाह समारंभास बंदी राहील.
* चहाची टपरी, दुकाने पूर्णतः बंद राहतील.
* अत्यावश्यक सेवा वगळून सर्व प्रकारची दुकाने पूर्णतः बंद राहतील.
* सिनेमाहॉल, नाट्य गृह, सभागृह, संग्रहालय पूर्णतः बंद राहतील.
* सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.
* सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील.
* सेतू ई-सेवा केंद्र,आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.
* व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग/एवेनिंग वॉक पूर्णतः बंद राहतील.
* बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील