बिहार : देशभरातील जनतेचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणुकांचा आज निकाल जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. मतमोजणीच्या सुरुवातीच्या दोन तासानंतर चमत्कार झालेला पाहायला मिळत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात पूर्णपणे पिछाडीवर पडलेल्या भाजपप्रणित ‘एनडीए’ने जोरदार पुनरागमन केले आहे.
सध्याच्या आकडेवारीनुसार, एकूण 243 जागांपैकी 131 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर महागठबंधन अवघ्या 96 जागांवर पुढे आहे. त्यामुळे एनडीए बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 जागा जिंकून बिहारमध्ये पुन्हा एकदा सत्तास्थापन करेल, असे चित्र तुर्तास दिसत आहे.
महत्वाच्या घडामोडी-
तेजस्वी यादवांमुळे नव्हे, तर कोरोनामुळे आमचा पराभव; जेडीयूचं अजब वक्तव्य
नितीश कुमार आणि पंतप्रधान मोदी हेच बिहारच्या पराभवाचे वाटेकरी- धैर्यशील माने
“मला पूर्ण खात्री आहे की, बिहारमध्ये तेजस्वी पर्व सुरू होईल”
नितीश कुमार की तेजस्वी यादव,कोण होणार मुख्यमंत्री?; बिहार निवडणुकीचा आज निकाल!