नाशिक : नाशिकमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या नगरसेविका किरण बाळा गामाणे (दराडे) यांनी कोरोना रुग्णालयाची उभारणी केली. मात्र या रुग्णालयाचे उद्घाटन शिवसेनेच्या नाही तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्याकडून करण्यात आलं आहे.
शहरात सिडको परिसरात या रुग्णालयाचे उद्घाटन झालं. मात्र, कोविड रुग्णालयाच्या उद्घाटनावरून शहरात चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. कारण येथील कोविड रुग्णालय हे शिवसेनेच्या नगरसेविकेनं उभारलं आहे. मात्र, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने मोफत रुग्णालयाचे लोकार्पण गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान, राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर होणाऱ्या अनेक कार्यक्रमांतील व्यासपीठावर दिसणारा हा बदल आतापर्यंत नेहमीच चर्चेचा मुद्दा ठरला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण”
मंत्रीपदाची ऑफर होती पण…; स्वाभिमानीच्या ‘या’ आमदाराची प्रतिक्रिया; म्हणाले…
ज्या नवऱ्यात ताकद असते तो दोन काय चार बायका सांभाळू शकतो; शिवसेनेचं राम शिंदेंना प्रत्युत्तर
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईचे दीर्घ आजाराने निधन