राष्ट्रवादीच्या ‘या’ मंत्र्याला कोरोनाची लागण

0
143

मुंबई : राष्ट्रवादीच्या आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण झाली आहे. पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

संजय बनसोडे हे लातूर जिल्ह्यातील उदगीर मतदारसंघात कोरोनाच्या काळात काम करत होते. आपल्या मतदारसंघातील काही कामानिमित्त बनसोडे मागचा आठवडाभर मुंबईमध्ये होते, तेव्हा पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

संजय बनसोडे हे उपचारांसाठी मुंबईत दाखल झाले आहेत. बनसोडे यांना ताप आणि घशात खवखव जाणवत असल्यामुळे त्यांची कालच कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यांच्या या कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

मंत्रालयात जायचा कंटाळा आला म्हणून…; मनसेचा मुख्यमंत्र्यांना टोला

कोरोनाच्या बाबतीत जगाच्या तुलनेत भारतातील स्थिती चांगली- नरेंद्र मोदी

राज्यात दोन मुख्यमंत्री; एक मातोश्रीत, तर दुसरे…; भाजपच्या ‘या’ नेत्याचे एका दगडात दोन पक्षी’

तीन चाकांचं सरकार एका दिशेने चालताय ना, मग तुमच्या पोटात का दुखतंय; मुख्यमंत्र्यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here