Home पुणे राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण; स्वत: फेसबुक पोस्ट करून दिली माहिती

राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण; स्वत: फेसबुक पोस्ट करून दिली माहिती

पुणे : राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: फेसबुक पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

27 तारखेला त्रास जाणवू लागल्याने काळजी म्हणून कोरोना चाचणी केली मात्र काल केलेल्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मी उपचारासाठी रूग्णालयात भरती झाल्याचं देखील त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे सांगितलं आहे.

दरम्यान, आज मी स्वतः कोरोनाबाधित झालो असलो तरीही, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही. मी जेथे असेल तेथून कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरू राहील, असं म्हणत हा लढा आपण जिंकणारच, असं देखील अतुल बेनके यांनी म्हटलं आहे.

अतुल बेनके आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणतात…

नमस्कार,
कोरोनाच्या संक्रमण काळात प्रशासनासोबत कार्य करताना अनेकांशी संपर्क येत होता. गुरुवारी २७ तारखेला त्रास जाणवू लागल्याने काळजी म्हणून कोरोना चाचणी केली. मात्र काल केलेल्या चाचणीचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मी सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे. मागील काही दिवसांत ज्या व्यक्ती व सहकारी माझ्या संपर्कात आले, त्यांनी काळजी म्हणून स्वतःची चाचणी अवश्य करून घ्यावी.

मागील साडे पाच महिने कोरोना या विषाणूशी आपण सगळे लढा देत आहोत. लॉकडाऊन, मिशन बिगीन अगेन या माध्यमातून कोरोनाचे संक्रमण थांबविण्याचा आपण सर्वांनीच प्रयत्न केला. या साडे पाच महिन्याच्या काळात प्रत्येक कोरोना वॉरियर्सने कोरोनाला हद्दपार करण्यासाठी निकराचा लढा दिला आजही देत आहेत. जुन्नर तालुका प्रशासन व सर्व लोकप्रतिनिधी आजही झटत आहे. वेळोवेळी नागरिकांना आवाहन करीत आहे. प्रत्येक व्यक्तीने स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या, प्रशासनाला सहकार्य करा असे मी स्वतः वेळोवेळी सांगत आहे. कारण काळजी घेतली नाही तर हा विषाणू जीवघेणा ठरू शकतो. आपल्या आरोग्याची काळजी आपणच घ्यायला हवी.

आज मी स्वतः कोरोनाबाधित झालो असलो. तरीही, आपल्या सेवेचे कार्य थांबणार नाही. मी जेथे असेल तेथून कोरोना परिस्थितीचा आढावा घेणे सुरू राहील. मी जरी पॉझिटिव्ह आलो तरी आपण पॉझिटिव्ह येऊ नये, यासाठी माझी धडपड सुरूच राहील. जे पॉझिटिव्ह आलेत त्यांना योग्य उपचार मिळावे, यासाठी व्यवस्था सुदृढ ठेवण्याचा माझा संकल्प या काळातही पूर्णत्वास नेईन, हा विश्वास देतो.
हा लढा आपण जिंकणारच!
सदैव आपलाच,
अतुल बेनके…..

(NCP MLA Atul Benke Tested Covid 19 Positive)

महत्वाच्या घडामोडी-

फक्त सत्तेच दार बंद झाल्याने भाजपचा घंटानाद; रूपाली चाकणकरांची भाजपवर टीका

दरोडेखोरांचा हल्ला; क्रिकेटपटू सुरेश रैनाच्या काकांचे निधन

एमएसईबी कार्यालय फोडणाऱ्या मनसैनिकाला राज ठाकरेंचा फोन; म्हणाले…

अनलॉक-4 च्या गाईडलाईन्सची घोषणा; ‘हे’ सुरू होणार