Home महाराष्ट्र राष्ट्रवादीचे टायमिंग चुकलं; बहुमत नसतानाही भाजपाने ही निवडणूक बिनविरोध जिंकली

राष्ट्रवादीचे टायमिंग चुकलं; बहुमत नसतानाही भाजपाने ही निवडणूक बिनविरोध जिंकली

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या सभापती व उपसभापती पदांसाठी गुरुवारी निवडणूक झाली. नरखेड पंचायत समिती येथे राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार वेळेत न पोहोचल्याने बहुमतातील राष्ट्रवादी उमेदवाराविनाच राहिली. अर्ज सादर करताना राष्ट्रवादीचे उमेदवार मयूर उमरकर यांचे टायमिंग चुकल्याने बहुमत नसतानाही भाजपाचे स्वप्निल नागापुरे अविरोध विजयी झाले.

हे ही वाचा : मुख्यमंत्र्यांना कोरोना काळात पैसे मोजताना मान वर करायलाही वेळ मिळाला नाही, त्यामुळे…; किरीट सोमय्यांचा टोला

राष्ट्रवादीतील गटबाजीमुळे असो किंवा हलगर्जीपणामुळे असो, बहुमतात असताना पद गमावल्याने पक्षाची नाचक्की झाल्याची प्रतिक्रिया पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यांमधून उमटत आहे.

दरम्यान, कामठी पंचायत समिती उपसभापतिपदाच्या निवडणुकीत काँग्रेसचे आशिष मल्लेवार यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपाच्या पूनम मालोदे यांचा दोन मतांनी पराभव केला. मौदा पंचायत समिती सभापती व उपसभापती पदाची निवडणूक बिनविरोध झाली. येथे कॉंग्रेसच्या वंदना सिंगनजुडे यांची सभापती, तर शिवसेनेचे ज्ञानेश्वर चौरे यांची उपसभापतीपदी निवड झाली. हिंगणा पंचायत समिती सभापतिपदाची निवडणूक उमेदवारांनी जातवैधता प्रमाणपत्र न सादर केल्यामुळे ऐन वेळी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी रद्द केली.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडीची वसुली जोरात तर कर्मचाऱ्यांची दिवाळी फिकी; ‘या’ नेत्याची टीका

“एसटी कर्मचाऱ्यांसाठी मनसे आक्रमक; विलिनीकरण करण्याच्या मागणीसाठी मनसेचं आंदोलन”

‘महाराष्ट्र सरकारने मुस्लिम मोर्चे थांबवले नाहीत तर…; नितेश राणेंचा राज्य सरकारला इशारा