Home महाराष्ट्र उल्हासनगरमध्ये चौकाचौकात झळकणार राष्ट्रवादीचे चमकणारे घड्याळ

उल्हासनगरमध्ये चौकाचौकात झळकणार राष्ट्रवादीचे चमकणारे घड्याळ

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

उल्हासनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पक्ष वाढीसाठी उल्हासनगरात महिन्याभरात दुसऱ्यांदा धाव घेतली आहे. विशेष म्हणजे यावेळी नवनियुक्त जिल्हाध्यक्ष पंचम कलानी आणि माजी जिल्हाध्यक्ष सोनिया धामी यांच्यातील दुरावा दूर करण्यात पाटील यांना यश मिळालं आहे.

उल्हासनगरात अनेक मुख्य चौकात राष्ट्रवादीच्या एलईडी घड्याळी बसवण्यात येणार आहेत. पाटील यांनी सोनिया धामी यांच्या निवासस्थानी भेट दिली आणि धामी यांना सन्मानपूर्वक प्रदेश सरचिटणीस पदाचे नियुक्तीपत्र सोपवले. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, निरीक्षक भगवान टावरे, सभागृहनेते भारत गंगोत्री उपस्थित होते.

हे ही वाचा : सत्तेचा माज चढला असेल तर सरकारमधून बाहेर पडा; राष्ट्रवादीचा काँग्रेसला इशारा

जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी वाढवण्याच्या उद्देशाने किंबहुना रणनीती तयार करण्यासाठी कलानी महाल गाठला. पप्पू कलानी, ओमी कलानी, पंचम कलानी, सीमा कलानी, मनोज लासी, कमलेश निकम, सुमित चक्रवर्ती यांनी त्यांचे स्वागत केले.

दरम्यान, जर्जर आणि धोकादायक इमारतींबाबत लवकरच ठोस निर्णय घेण्यात येणार असून विकास निधी उपलब्ध करून देण्यात येणार, असल्याचे आश्वासन पाटील यांनी दिले. उल्हासनगर शहर, कल्याण ग्रामीण व मुरबाड येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या भेटी घेत संघटनेचा काल आढावा घेतला. जर उत्साहाने संघटन वाढीसाठी प्रयत्न झाले तर नक्कीच पुढच्या वेळी आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास जयतं पाटील कार्यकर्त्यांना दिला.

महत्वाच्या घडामोडी –

कंगणानं केलेलं वक्तव्य जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीनं केलं असतं तर…; ओवैसी कडाडले

“मोठी बातमी! मुख्यमंत्री कार्यालय आणि वर्षा निवासस्थानी पुन्हा एकदा कोरोनाची एन्ट्री”

शिवचिंतनात रमलेला असा अलौकिक शिवआराधक होणे नाही; मुुख्यमंत्र्यांकडून पुरंदरेंना श्रद्धांजली