“राष्ट्रवादीच्या रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही”

0
965

पुणे : रामदास आठवले ‘र ला र आणि ट ला ट जोडून कविता करुन स्टंट करतात’, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी केली होती. यावर आरपीआयची महिला आघाडी आक्रमक झाली असून त्यांनी रूपाली चाकणकरांवर निशाणा साधला आहे.

रामदास आठवले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने रूपाली चाकणकर यांच्या घरावर आरपीआयच्या महिला आघाडीने मोर्चा काढला. तसेच आरपीआयच्या महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत चाकणकर यांच्या घराच्या परिसरात निदर्शने केली. चाकणकर यांच्या छायाचित्राला काळे फासून चपलाचे जोडे देखील मारल्याचं कळतं आहे.

दरम्यान, आठवले साहेब यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने हा मोर्चा काढण्यात आला आहे. यापुढे रूपाली चाकणकर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचं आरपीआयच्या महिला प्रदेशाध्यक्षा संगीता आठवले यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“दिल्लीतील हिंसा सुनियोजित त्याला अमित शहा जबाबदार, त्यांचा राजीनामा घ्या”

गिरीश बापट यांचा स्वभाव काँग्रेससारखा- अजित पवार

…तर झेपत नाही म्हणून जाहीर करा; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यावर टीका

“हरलो म्हणून खचून जायचं नाही हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिलं”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here