आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी अखेर माघार घेतली आहे. मुरजी पटेल यांनी माघार घेतल्यामुळे आता ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आहे. यावरच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे ही वाचा : भाजपाच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचा झेंडा; जिंकल्या ‘इतक्या’ जागा
राज्यात गेले काही दिवस राजकीय नाट्य सुरू होते. ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर न करणे, त्यांचे नाइलाजाने न्यायालयात जाणे, त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावणे, हे अत्यंत क्लेशदायक होते, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीसाठीच शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह आणि नाव गोठवण्यात आले; परंतु शरद पवारांनी केलेल्या आवाहनानंतर भाजपला उशिरा सुचलेले शहाणपण आहे. अन्यथा भाजपला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले असते, असंही जयंत पाटील म्हणाले आहेत.
महत्त्वाच्या घडामोडी –
“रायगडमध्येही मनसेचा भगवा झेंडा फडकला; सरपंच पदासह 7 जागा जिंकत ग्रामपंचायतीवर मिळवलं वर्चस्व”
माझ्या जीवाला काही बरं-वाईट झाल्यास, शिंदे- फडणवीस जबाबदार; ठाकरे गटाच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा आरोप
“मनसेनं विजयी खातं उघडलं; ‘या’ ठिकाणी 2 ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला”