“राष्ट्रवादीचा भाजपला दे धक्का; ‘हा’ मोठा नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश”

0
1172

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं भाजपला मोठा धक्का दिला आहे.

भाजपचे परभणीतील नेते, माजी आमदार विजय गव्हाणे यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या उपस्थितीत गव्हाणे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

हे ही वाचा : शरद पवार घटनाबाह्य संविधानाला डावलून मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक कशी काय घेऊ शकतात?; भाजप नेत्याचा सवाल

दरम्यान, शरद पवार यांच्यासोबत, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत गव्हाणे हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. तसेच हा पक्षप्रवेश मुंबईतील राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी – 

सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण; आयसीयू मध्ये केलं दाखल

टोपेजी, इतकेही निर्बंध लादू नका की, जीवच नकोसा होईल- चंद्रकांत पाटील

शिवसेनेनं फडणवीसांना मुख्यमंत्री करावं, त्यांनी भाजपसोबत जावं- रामदास आठवले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here