राष्ट्रवादीकडून राजू शेट्टींना आमदारकीची खुली ऑफर; तशी शरद पवारांचीच इच्छा

0
198

मुंबई : राज्यपाल कोट्यातून काही जागा भरल्या जाणार असून त्यातल्या एका जागेवर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आमदार व्हावं, अशी खुली ऑफर राष्ट्रवादीने शेट्टी यांना दिली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांची भेट घेतली.

विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त एकूण 12 जागा भरायच्या आहेत. त्यातील किमान चार जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकतात. राजू शेट्टी यांच्यासारखा संघर्ष करणारा नेता विधानपरिषदेत जावा, अशी स्वत: शरद पवार यांचीच भूमिका आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, याबाबत दोन दिवसात आपण निर्णय घेऊ, असं राजू शेट्टी यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता’ या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

महत्वाच्या घडामोडी-

ते येत आहेत तर चांगलं आहे, ज्ञानात भर पडेल; कोकण दौऱ्यावरून शरद पवारांचा देवेंद्र फडणवीसांना चिमटा

ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाला देवेंद्र फडणवीसांचा पाठिंबा; म्हणाले…

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चपराक दिली; देवेंद्र फडणवीसांची राज्यसरकारवर टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून कोकण दौऱ्यावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here