आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीत जोरात इन्कमिंग सुरू आहे. आजही भारिप आणि भाजपसह अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
राष्ट्रवादीने भारिपला मोठं खिंडार पाडलं आहे. वाशिमच्या कारंजा-मानोरा नगरपंचायतीतील भारिपच्या 23 नगरसेवकांनी आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे कारंजा-मनोरा ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीचं बळ वाढलं आहे.
हे ही वाचा : “काँग्रेसला वगळून पवारांच्या साथीने आघाडी निर्माण करण्याचा ममतादीदींचा प्रयत्न”
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम, मावळ आणि ठाणे ग्रामीण भागातील भारिप, भाजपच्या अनेक नेत्यांनी व नगरसेवकांनी आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
दरम्यान, हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्यासह हेमेंद्र ठाकरे, जुम्मा पप्पुवाले, फिरोज शेकुवाले, चांदशा कासमशा, अ.एजाज अ. मन्नान, जावेदोद्दीन शेख, इरफान खान इनायतुल्ला खान, जाकीर शेख मोहम्मद इसहाक, सलीम प्यारेवाले, राजू इंगोले, सलीम शेख लालू गारवे, अहमद रशीद अ. कादीर, जाकीर अली अब्बासअली, अ.आरीफ अ.वारिस मौलाना, सै. मुजाहीद सै. अजीज, निसारखान नजीरखान डॉ. धनंजय राठोड, मो. फैजल नागानी, संतोष भोयर, गोपाल खोडके, मो. सोहेल अंसारी, अ. बशीर रहीम, शेषराव राठोड या भारिपमधील 23 नगरसेवक व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
महत्वाच्या घडामोडी –
आशिष शेलार तुम्ही गुजराती शिकून घ्या; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा टोला
“आगामी निवडणुकीतही काँग्रेसला 300 जागा मिळणार नाहीत; ‘या’ मोठ्या नेत्याचा पक्षाला घरचा आहेर”
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अखेर रूग्णालयातून डिस्चार्ज; रूग्णालयातून ‘वर्षा’वर