राष्ट्रवादीची भाजपच्या ‘या’ आमदाराला डायरेक्ट ऑफर?; चर्चांणा उधान

0
568

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांनी जाहीर कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि  उपमुख्यमंत्री अजित पवारांचं तोंडभरुन कौतुक केलं. यानंतर राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरेंना डायरेक्ट ऑफरच देऊन टाकलीय.

हे ही वाचा : पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण; भाऊ धनंजय मुंडेंनी केला पंकजाताईंना मेसेज

तुम्ही ज्याप्रमाणे आज दादांचं कौतुक केलं. भाऊ तुमच्याही कामाची पद्धत मी जवळून पाहिली आहे. तुम्हीपण हाडाचा कार्यकर्ता म्हणून चांगलं काम करता. पण भाऊ ठिक आहे. होतात… चुकतो तोच माणूस असतो. आज आमच्या नेत्यांचा उल्लेख तुम्ही एवढा चांगला केलाय. असाच चांगला विचार भविष्यात करा, असं म्हणत दत्तात्रय भरणे यांनी जयकुमार गोरे यांना डायरेक्ट ऑफर दिली आहे.

दरम्यान, दादांचं काम, दादांचं कर्तृत्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. राजकीय विचार आमचे विरोधात असतील पण मामा, मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन दादांचा फॅन आहे. मला सांगायला काही अडचण वाटत नाही, आमचं राजकीय जमतं का तर जमतंच नाही. पण दादांची शिस्त, दादांचं धाडस, दादांचा स्पष्टवक्तेपणा… दादांचं दादांकडेच आहे दुसऱ्या कुणाकडे नाही, असं जयकुमार गोरेंनी म्हटलं होतं.

महत्वाच्या घडामोडी – 

“भाजपच्या ‘या’ आमदाराकडून अजित पवारांचं तोंडभरुन कौतुक”

 ‘…तेव्हा मुंबई”करां”ची आठवण झाली’; मालमत्ता कराच्या निर्णयावरुन शेलारांची टीका

बीड जिल्हा परिषद निवडणुक; मुंडे भावंडांची प्रतिष्ठा पणाला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here