पंकजा मुंडेंनी सुरू केलेल्या ऑनलाइन बदली धोरणाला राष्ट्रवादीचा खो

0
281

मुंबई : भाजप सरकारमधील ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी सुरू केलेल्या ऑनलाइन बदली धोरणाला राष्ट्रवादीचे नेते व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी खो दिला असून जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्यांसाठी लवकरच नवीन धोरण जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.

भाजप सरकारच्या काळात पंकजा मुंडे यांनी ग्रामविकासमंत्री या नात्याने जिल्हा परिषदांच्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत ऑनलाइन बदलीचे धोरण आणले होते. त्यामुळे पारदर्शकता आल्याचा व बदल्यांमधील भ्रष्टाचार कमी झाल्याचा दावा मुंडे यांनी के ला होता. मात्र, सत्तांतर होऊन महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर ग्रामविकास विभाग हा राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याकडे आला.

दरम्यान, अनेक शिक्षक बदल्यांसाठी जिल्हा परिषदा आणि मंत्रालयात वारंवार येत असल्याचे निदर्शनास आल्याचे सांगत बदल्यांच्या प्रक्रियेत सुसूत्रता आणण्यासाठी अभ्यास गट नेमण्याचा निर्णय जाहीर झाला होता

महत्वाच्या घडामोडी-

संसर्ग कमी करण्यासाठी ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ महत्वाचे निर्णय

भीमा कोरेगावची दंगल सुनियोदित होती, शरद पवार आयोगाकडे साक्ष देतील- नवाब मलिक

‘ओम भट स्वाहा’ करूयात या करोना व्हायरसचा; महेश कोठारेंनी केला तात्याविंचूचा व्हिडीओ शेअर

भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स; 4 एप्रिल रोजी आयोगासमोर हजर राहण्याचा आदेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here