पिंपरीत राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम; महापालिकेतील ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
453

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आगामी महापलिकच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबईतील पक्ष कार्यालयात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे विद्यमान नगरसेवक अपक्ष गटनेते कैलास भालचंद्र बारणे यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला.

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कैलास बारणे यांचा पक्ष प्रवेश महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, यावेळी प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, माजी विरोधी पक्षनेते संतोष नागुभाऊ बारणे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, अभय मांढरे हे मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

माजी मंत्री म्हणू नका, एक दोन दिवसात तुम्हाला कळेल; चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात खळबळ

बदामाचा खुराक चालू करा म्हणजे…; रुपाली चाकणकरांचा टोला

‘सरकारने आता तरी जागं व्हावं’, मराठा तरुणाच्या आत्महत्येनंतर संभाजीराजेंनी व्यक्त केला संताप

सर्व निवडणुकीसाठी अध्यादेश लागु होईल याची खात्री सरकार देईल का?; पंकजा मुंडेंचा सवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here