“औरंगाबादमध्ये राष्ट्रवादीचा करेक्ट कार्यक्रम; MIM च्या 3 नगरसेवकांचा जयंत पाटलांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश”

0
422

आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत इनकमिंग सुरूच असतानाच औरंगाबादमध्ये एमआयएम पक्षाला मोठा धक्का बसला आहे. एमआयएमच्या 3 नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

औरंगाबाद येथील एमआयएम पक्षाच्या नगरसेविका साजेदा सईद फारुकी आणि सईद फारूकी यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ‌यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

दरम्यान, जयंत पाटील यांनी पक्षप्रवेश केलेल्या मान्यवरांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी औरंगाबादचे शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख व प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे उपस्थित होते.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुढचे 3 वर्षे मुख्यमंत्री राहणार असतील तर, युतीसाठी आमची तयारी”

“कदाचित रावसाहेब दानवेंना शिवसेनेत यायचं असेल”

…म्हणून मुख्यमंत्र्यांनी मनातली भावना बोलून दाखविली- देवेंद्र फडणवीस

चंद्रकांत दादा, तीन पक्षांपैकी एका पक्षात प्रवेश करणार, असं माझ्या कानावर आलंय- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here