“राष्ट्रवादीची मोठी खेळी; एमआयएम, भाजपमधील ‘या’ मोठ्या नेत्यांनी हाती बांधलं घड्याळ”

0
860

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं कंबर जोरदार कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीनं आता एमआयएम, भाजप व शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

कल्याण-डोंबिवलीचे एमआयएम पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष अयाज गुलजार मौलवी, केडीएमसीमधील एमआयएम नगरसेवक तन्झिला अयाज मौलवी, ॲड.आर. झेड. हास्मी, अर्शद शब्बीर शेख, मोहम्मद मेहबूब शेख,अकदूस सोहेल सुसे, हरमीत सिंग गुप्ता यांच्यासह १०५ पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

हे ही वाचा : रेणु शर्माला अटक झाल्यानंतर सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील अपक्ष नगरसेवक कुणाल दिनकरशेठ पाटील, शिवसेनेच्या नगरसेविका सौ. उर्मिला गोसावी, भाजपच्या नगरसेविका सौ. सुनिता खंडागळे, माजी नगरसेवक फैसल जलास यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

कल्याण ग्रामीण मधील अनेक ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच, उपसरपंच आणि मनसे, युवासेना, आरपीआय, समाजवादी पार्टी व विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचाही यावेळी पक्षप्रवेश झाला. हे पक्षप्रवेश राज्याचे गृहनिर्माण मंत्री ना. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

महत्वाच्या घडामोडी –

“राष्ट्रवादी पक्षाचा काँग्रेसला दणका; ‘या’ मोठ्या नेत्यासह अनेकांनी हाती बांधलं घड्याळ”

गुणरत्न सदावर्तेंची गाढवाशी तुलना करत शिवसेनेचा हल्लाबोल, म्हणाले…

राज ठाकरेंचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेना, राष्ट्रवादीला टोला, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here