आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. याबाबत आता एक मोठी बातमी समोर आली आहे. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची सिल्वर ओकवरील बैठक संपली आहे. या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीत नवाब मलिकांच्या राजीनामा घेवू नये अशी भूमिका अनेकांनी घेतली आहे. मात्र मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष पदाचा अतिरिक्त कार्यभार राखी जाधव यांच्याकडे देण्यात येणार आहे. तसेच नवाब मलिक यांच्याकडे जी पालकमंत्रीपद आहेत तीही काढून घेण्यात येणार आहे.
हे ही वाचा : गोव्याच्या जनतेनं शिवसेना, राष्ट्रवादीला त्यांची जागा दाखविली; नितीन गडकरींची टोलेबाजी
दरम्यान, नवाब मलिक सध्या गोंदिया आणि परभणीचे पालकमंत्री आहेत. त्यांचा कार्यभार दुसऱ्या मंत्र्यांकडे दिला जाणार आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे परभणी तर प्राजक्त तनपुरे यांच्याकडे गोंदियाचा कार्यभार दिला जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मनसेचा आदी IPL च्या बसेसवर खळखट्याक; आता आदित्य ठाकरेंवर निशाणा
गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी आपलं नशीब आजमावयला आले होते, पण…; देवेंद्र फडणवीसांचा टोला
“मनसेत पक्षप्रवेशाचा धुमधडाका सुरूच, संभाजीनगरमधील अनेक तरूणांनी हाती धरला मनसेचा भगवा झेंडा”