राष्ट्रवादीचा शिवसेनेला मोठा धक्का; शिवसेनेच्या ‘या’ नगराध्यक्षांसह कुटुंबियांचा राष्ट्रवादीत प्रवेश

0
475

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

रत्नागिरी : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात दापोली नगरपंचायच्या शिवसेनेच्या  नगराध्यक्षा परवीन शेख यांच्या कुटुंबियांनी शनिवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला. या प्रवेशाने  मोठी खळबळ उडाली आहे. परवीन शेख यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा न दिल्याने त्या तांत्रिक दृष्ट्या शिवसेनेच्या आहेत. असं असले तरी कार्यकाळ संपल्यावर त्याही राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशी माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात येते आहे.

हे ही वाचा : राजकीय पोळी भाजा, पण…; एसटी संपावरुन अनिल परब यांचा पडळकर आणि खोतांना इशारा

रायगड कोलाड येथे रायगड मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रायगडमध्ये त्यांचा हा पक्ष प्रवेश पार पडला. दापोलीत शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान, शिवसेनेचे काही महत्त्वाचे पदाधिकारी आमच्या पक्षात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप राजपुरे यांनी दिली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

आगामी हातकणंगले लोकसभा निवडणूकीसाठी ‘या’ नेत्याला मिळणार भाजपकडून उमेदवारी?

राष्ट्रवादीचे टायमिंग चुकलं; बहुमत नसतानाही भाजपाने ही निवडणूक बिनविरोध जिंकली

राष्ट्रवादीचे टायमिंग चुकलं; बहुमत नसतानाही भाजपाने ही निवडणूक बिनविरोध जिंकली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here