“गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचं उद्या पुण्यात आंदोलन”

0
185

पुणे : शरद पवार हे या महाराष्ट्राला लागलेला कोरोना आहे, अशी घणाघाती टीका भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केली आहे. गोपीचंद पडळकर यांच्या या टीकेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला असून पुणे राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या आंदोलनाची हाक दिली आहे.

गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते गुरुवारी सकाळी 10 वाजता लोकमान्य टिळक पुतळा, मंडई येथे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्याबाबत अतिशय अश्लाघ्य भाषेत वक्तव्य केले आहे. राजकारणात मतभेद असू शकतात, मात्र एखाद्या व्यक्तीबद्दल इतक्या खालच्या पातळीवर येऊन असे वक्तव्य करणे, भारतीय जनता पक्षाच्या संस्कृतीला शोभते का असा सवाल अंकुश काकडे यांनी विचारला.

महत्वाच्या घडामोडी-

“शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला कोरोना”- गोपीचंद पडळकर

राज ठाकरेंसोबत जाण्याची आमची इच्छा होती पण…; देवेंद्र फडणवीसांच वक्तव्य

टेस्टिंग वाढवा, कोरोना लढ्यासाठी महापालिकांना मदत करा; फडणवीसांचं राज्य सरकारला आवाहन

शेतकऱ्यांना कर्ज न देणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हे दाखल होणार; राज्य सरकारचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here