आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले असं वक्तव्य अभिनेत्री कंगना रणौतने केलं असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. याचे पडसाद महाराष्ट्रभर उमटल्याचे दिसत आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पुण्यात राष्ट्रवादीच्यावतीने कंगनाच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. कंगना रनौतवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात येत आहे. “या कंगनाचं करायचं काय, खाली डोकं वर पाय, कंगना रनौत माफी मागो, कंगना रनौतचा धिक्कार” अशी घोषणाबाजीही कार्यकर्त्यांनी केली आहे.
हे ही वाचा : “राज ठाकरे घेणार शरद पवार यांची भेट; एसटी कामगारांचा संप मिटणार?”
अभिनेत्री कंगनाच्या वक्तव्याचा निषेध करत आहे. या वक्तव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. यांना देशाच्या राष्ट्रपुरुषांचा इतिहास झाकून एक मनुवादीवृत्ती पुढे आणायची आहे. त्यासाठी कंगनाला पुढे ठेवून अशी पेरणी केली जात आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी यावेळी केला.
दरम्यान, या प्रकरणी ऑल इंडिया प्रोफेशनल्स काँग्रेसच्यावतीने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. PASA कायदा 1985 अंतर्गत कंगनावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या तब्येतीबाबत डाॅक्टरांनी दिली महत्त्वाची बातमी; म्हणाले…
भाजपच्या माजी मंत्र्यानं मंदिराच्या नावाखाली मोठी जमीन हडपली; नवाब मलिकांच्या आरोपामुळं खळबळ
“एसटी कर्मचाऱ्यांच्या चुली विझवणाऱ्या या सरकारला आता कायमचं निलंबित करण्याची वेळ आलीये”