आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
खंडाळा : राष्ट्रवादी काँग्रेस शेतकरी हितासाठी ताकदीने मैदानात उतरणार आहे. खंडाळा तालुक्यातील खंडाळा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने कंबर कसली असून राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची यादी तयार केली आहे. या संदर्भात आमदार मकरंद पाटील यांनी माहिती दिली.
शेतकऱ्यांना वेळेवर बिले न मिळणे, कामगारांचे थकलेले वेतन, सभासद तसेच कामगारांच्या नावावर त्यांना न कळून येणारी कर्जे हे यामागचे मुख्य कारण आहे. तर गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे मकरंद पाटील यांनी लक्ष न घातल्याने सत्ताधारी गटाने एकहाती निवडणूक जिंकली. याचा मोठा फटका राष्ट्रवादीला बसला आहे. आता पाटील यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. या भेटीदरम्यान निवडणुकीसंदर्भात रणनीती आखण्यात आली. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारीसाठी मुलाखत व चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
दरम्यान, कॉंग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजू कदम व तालुक्यातील अनेक कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून विरोधकांना धक्का दिला. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी चुरशीची लढत पाहायला मिळेल.
महत्वाच्या घडामोडी –
‘…अन्यथा मानहानीचा दावा दाखल करणार’, संजय राऊतांचा चंद्रकांत पाटलांना इशारा
भाजपविरोधात राष्ट्रवादी लढण्यास तयार, होऊ दे सामना; नवाब मलिक यांचं खुलं आव्हान
“महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्रित आलेले तिघेही दरोडेखोर”
शिवसेनेचा आवाज कोणीही दाबू शकत नाही; आदित्य ठाकरेंचा इशारा