आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
धुळे : शरद पवार यांना पंतप्रधान तर, अजित पवार यांना एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करायचे आहे, अशी इच्छा राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी काल चिंचवड येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलून दाखवली. त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी प्रतिक्रिया दिली.
अडीच वर्ष शिवसेनेला आणि अडीच वर्ष राष्ट्रवादीला मुख्यमंत्रिपद देण्याचं मी मध्यंतरी ऐकलं होतं. परंतु ही त्यांची पक्षांतर्गत गोष्ट आहे. तरीही राष्ट्रवादीने अजितदादांना मुख्यमंत्रिपदाची संधी द्यायला काहीच हरकत नाही, असं माझ्या सारख्या कार्यकर्तीला वाटत आहे, असं चित्रा वाघ म्हणाल्या. त्या धुळे येथे जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारावेळी बोलत होत्या.
दरम्यान, तिन्ही पक्षातील नेते एकमेकांना सल्ले देताना दिसतायत. ते सल्ले राज्यासाठी महत्वाचे नाहीत. राज्यात पूरपरिस्थिती आहे, शेतकऱ्यांचे हाल होत आहे. युवकांना रोजगार नाही, महिला सुरक्षित नाहीत, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
खानापूरमध्ये पुढचा आमदार राष्ट्रवादीचाच असेल ; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा विश्वास
कंगना रनौतला मिळणार भाजपाकडून लोकसभेची उमेदवारी?
अमोल कोल्हे म्हणाले, अजित पवारांना मुख्यमंत्री करायचं; फडणवीस म्हणतात…
पालघर जिल्हा परिषदेत मनसेचा झेंडा फडकवण्यासाठी राज ठाकरेंचे शिलेदार मैदानात