भिवंडीत काँग्रेसला खिंडार! ‘या’ माजी शहराध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश; 10 नगरसेवकही लवकरच करणार पक्षप्रवेश

0
362

मुंबई : राष्ट्रवादीने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. भिवंडी शहराध्यक्षपदावरून हटवण्यात आल्यामुळे नाराज झालेले शोएब गुड्डू खान यांनी काँग्रेसला खिंडार पाडत राष्ट्र्वादीत प्रवेश केला.

शोएब खान यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे भिवंडीत काँग्रेसला मोठा धक्का बसल्याची चर्चा सध्या सुरू आहे.

शोएब खान यांच्यानंतर त्यांचे समर्थक असलेले काँग्रेसचे 10 नगरसेवक आणि पदाधिकारीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खान यांच्या गोटातून देण्यात आली आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही संधीचा लाभ घेत शोएब खान यांची भिवंडी शहर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मुख्यमंत्री हे संकट मोचन, अनेक संकटे येऊनही ते उत्कृष्ट काम करत आहेत”

2024च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला स्वबळावर सत्तेत आणू- देवेंद्र फडणवीस

“…तर मी त्याच्यासोबत झोपेन; हत्या प्रकरणेबाबत ‘या’ अभिनेत्रीची धक्कादायक पोस्ट”

राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘या’ नेत्याच्या गाडीवर दगडफे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here