जळगावमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; भाजपचा ‘हा’ मोठा नेता असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत

0
785

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जळगाव : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी विरोधी पक्षातील पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचं सत्र सुरू केलं आहे. अशातच राष्ट्रवादीने जळगावात भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीने थेट भाजपच्या केंद्रीय सदस्याला पक्षात घेऊन माजी मंत्री गिरीश महाजन यांनाही मोठा धक्का दिला आहे.

हे ही वाचा : मनसे प्रमुख राज ठाकरेंची कोरोनावर मात

भाजपचे केंद्रीय सदस्य घनश्याम अग्रवाल यांनी आपल्या असंख्य समर्थकांसह आज राष्ट्रवादीत प्रवेश केला. या कार्यक्रमात माजी विधानसभा अध्यक्ष अरुणभाई गुजराथी माजी मंत्री गुलाबराव देवकर माजी मंत्री सतीश पाटील माजी आमदार मनीष जैन जिल्हा अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील माजी आमदार कैलास पाटील माजी शिक्षक आमदार दिलीप सोनवणे आदी उपस्थितीत होते

दरम्यान, भाजपामध्ये माजी घुसमट होत होती एकनाथराव खडसे यांच्या पक्ष प्रवेशा सोबतच जायला पाहिजे होतं परंतु त्यांनी काही काळ थांबण्यास सांगितले होते. मात्र आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरदचंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, अशी माहिती घनश्याम अग्रवाल यांनी दिली.

महत्वाच्या घडामोडी – 

 वयोमर्यादा ओलांडलेल्या सर्व विद्यार्थ्यांना सरसकट 2 वर्ष वाढीव संधी द्या; संभाजीराजेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

 बुलढाणात काँग्रेसचा भाजपाला धक्का! नगराध्यक्षांसह जिल्हा परिषद सदस्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश

 पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ येणार एकाच व्यासपीठावर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here