Home महाराष्ट्र “राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाकरे सरकारच्या लाॅकडाऊनला विरोध”

“राष्ट्रवादी काँग्रेसचा ठाकरे सरकारच्या लाॅकडाऊनला विरोध”

मुंबई : वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकारने लाॅकडाऊनच्या दिशेने पावलं उचलण्याची तयारी सुरू केली आहे. काल टास्क फोर्सच्या बैठकीदरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात लाॅकडाऊनचे संकेत दिले आहे. पण यावर महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचा याला विरोध असल्याचं पहायला मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी महाराष्ट्रात कोरोना गरजेचं नाही, असं मत व्यक्त केलं आहे. त्यामुळे विरोेधी पक्षानंतर आता सत्तेत असणाऱ्या पक्षानं पहिल्यांदाच अशी भुमिका घेतल्यानं सर्व स्तरावरून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात लाॅकडाऊन गरजेचा नसुन आरोग्यव्यवस्था सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणं गरजेचं असल्याचं नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“…तर देशवासीयांचा आपल्या लाडक्या पंतप्रधानांवरील विश्वास अधिक दृढ होईल”

भाजप नेत्यांकडून मदती ऐवजी फक्त राजकारण केलं जातय- किशोरी पेडणेकर

नाईट लाईफ लोकांची नसते, ती तुमची असते; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे सरकारला टोला

होय, मीच रॉयल बेंगॉल टायगर, मृत वाघापेक्षा जखमी अधिक खतरनाक- ममता बॅनर्जी