आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : 1947 ला मिळालेले स्वातंत्र्य भिकेत मिळालं होतं. खरे, स्वातंत्र्य 2014 ला मिळालं, असं वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावतने 10 नोव्हेंबर रोजी एका मुलाखतीत केलं होतं. यावरुन आता कंगना राणावतविरुद्ध कारवाई करा ,अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने बोरीवलीच्या मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट न्यायालयात केली आहे.
देशाला 1947 ला मिळालेल्या स्वातंत्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या अभिनेत्री कंगना राणावतविरुद्ध कारवाई करा, अशी मागणी करणारी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्यक शाखेचे सरचिटणीस युसूफ परमार यांनी केली.
हे ही वाचा : पुणे जिल्ह्यात काँग्रेसचा झेंडा पूर्ण ताकदीने फडकेल; नाना पटोलेंनी व्यक्त केला विश्वास
की, पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर कंगनाने व सोशल मीडियावर म्हटले होते की, ‘1947 ला मिळालेले स्वातंत्र्य भिकेत मिळाले होते. खरे, स्वातंत्र्य 2014 ला मिळाले.’ यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत, असं युसूफ परमार यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, या विधानाने कंगनाने संविधान आणि स्वातंत्र्य योद्ध्यांचा आणि शहिदांचाही अपमान केला आहे. याबाबत 13 नोव्हेंबर रोजी मुंबईच्या मालाड पोलीस ठाण्यात कंगनाविरुद्ध तक्रार केली आहे; पण त्यावर कारवाई न झाल्याने परमार यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, राज्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा 1 डिसेंबरपासून सूरू होणार”
सुशांत सिंग राजपूतची हत्या होऊनही मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मात्र…; नारायण राणेंचा गंभीर आरोप
राष्ट्रवादीकडून मनसेला खिंडार; मनसेच्या ‘या’ बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश