Home महाराष्ट्र नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व; काटोल,नरखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व; काटोल,नरखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादीचा झेंडा

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नागपूर : आज झालेल्या पंचायत समिती निवडणुकीमध्ये काटोल व नरखेड पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा फडकला आहे.

वाशिम जिल्ह्यातील कारंजा, रिसोड, वाशिम, मंगरूळपीर, मानोरा आणि मालेगाव या सहा पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतिपदासाठी आज निवडणूक झाली. यामध्ये राष्ट्रवादीने बाजी मारली आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंनीच राज ठाकरेंचा राजकीय गेम केला; शिंदे गटातील ‘या’ आमदाराचा धक्कादायक आरोप

नरखेड पंचायत समितीमध्ये महेंद्र गजबे हे सभापतिपदी बिनविरोध तर उपसभापतिपदी माया प्रवीण मुढोरिया विजयी झालेत. तर काटोल पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय डांगोरे हे सभापती तर उपसभापतिपदी निशिकांत नागमोते हे बिनविरोध निवडून आले आहेत.

कारंजा पंचायत समिती सभापतिपदी राष्ट्रवादीचे प्रदीप देशमुख यांनी बिनविरोध तर उप सभापतिपदी  वंचितच्या अलका अंबरकर यांची निवड झाली. रिसोड पंचायत समिती  सभापतिपदी  राष्ट्रवादी काँग्रेसच्या केशरबाई हाडे तर उपसभापतिपदी शिंदे गटातील सुवर्णा नरवाडे यांची निवड झाली आहे.

महत्त्वाच्या  घडामोडी –

“मोठी बातमी! मनसे अध्यक्ष राज ठाकरे-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 20 मिनिटं खलबतं; चर्चांना उधाण”

“पुन्हा महाविकास आघाडीची सरशी; ‘या’ निवडणूकीत 5 जागांवर बाजी मारली, तर भाजपच्या पदरी काय?”

… मग कळेल कोन आहे की मशाल; नितेश राणेंच्या ‘मशाल’ चिन्हावरूनच्या टीकेवर ठाकरे गटाचा पलटवार