पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाकडून राष्ट्रवादीचा उमेदवार जाहीर; जयंत पाटलांनी दिली माहिती

0
161

सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवार जाहीर केला आहे. राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी राष्ट्रवादीने भारत भालके यांचे सुपुत्र भगीरथ भारत भालके यांना उमेदवारी दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मान्यतेने पंढरपूर – मंगळवेढा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत श्री. भगीरथ भारत भालके यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार घोषित करण्यात येत आहेत. ते नक्की विजय होतील, असा आम्हाला विश्वास आहे. भगीरथ भालके यांना शुभेच्छा, असं जयंत पाटील यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके विरुद्ध भाजपचे समाधान अवताडे विरुद्ध शिवसेनेच्या शैला गोडसे अशी लढत होणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

दीपालीच्या आत्महत्येला शिवकुमार एकटा जबाबदार नाही- चित्रा वाघ

उद्धव ठाकरे यांना कठोर निर्णय घेता येत नाहीत- प्रकाश आंबेडकर

रश्मी शुक्ला यांचं फोन टॅपिंग चुकीचं होतं तर सरकार इतके दिवस गप्प का होतं?- चंद्रकांत पाटील

देवेंद्र फडणवीस नव्हे, आघाडी सरकारच अस्वस्थ झालंय- प्रवीण दरेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here