आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
ठाणे : कळव्यात आज होणाऱ्या लसीकरणाच्या माहितीसाठी राष्ट्रवादीकडून बॅनर लावण्यात आले होते. परंतु शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञातांनी ते बॅनर फाडल्याची घटना उघडकीस आली. याच मुद्यावरुन राष्ट्रवादीच्या शहर अध्यक्षांनी थेट शिवसेना आणि पालिका प्रशासनावर टिका केल्याने राष्ट्रवादी-शिवसेनेत नव्या वादाला सुरूवात झाली आहे.
राष्ट्रवादीचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी पुढील 24 तासात पोलिसांनी बॅनर फाडणाऱ्यांना अटक करावी अन्यथा कळवा पोलीस ठाण्याला घेराव घालण्याचा इशारा दिला.
हे ही वाचा : तुमच्या पक्षात किती कट्टर शिवसैनिक आहेत ते सांगा?, प्रवीण दरेकरांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
महाविकास आघाडीच्या सरकारकडून महापालिकेला लसी उपलब्ध करुन दिल्या जात आहे. त्यानंतर महापालिकेकडून लसीकरण मोहीम राबवली जाते. त्यामुळे याचे श्रेय महाविकास आघाडी सरकारमधील तिन्ही पक्षाला आहे. केवळ शिवसेनेला नाही, त्यामुळे याची जाणीव खासदारांनी ठेवावी, असं आनंद परांजपे म्हणाले आहेत.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रभागात लसीकरणाची मोहीम घेतली जाते, त्यावेळेस पालिकेचे बॅनर लागणे अपेक्षित आहे. परंतु कळव्यात जे लसीकरण सुरु आहे, तेथे शिवसेना नेत्यांचे फोटे लावून हे लसीकरण शिवसेना करते आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे शिवसेनेत जाणार आहेत, का? असा सवालही आनंद परांजपेेंनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी –
बाळासाहेब असते तर सर्वात आधी यांनाच हाकलून दिलं असतं- नितेश राणे
राष्ट्रवादीत जोरदार इनकमिंग, माळेगावच्या संचालकानं हाती बांधलं घड्याळ
“हिंदुहृदयसम्राटांचं भाषण म्हणजे असायची पर्वणी, आता मात्र सगळंच अळणी”