नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बहिणीचं कर्करोगामुळे निधन

0
209

मुंबई : अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याची बहीण सायमा तमशी सिद्दीकी हिने जगाचा निरोप घेतला. कर्करोगामुळे वयाच्या 26 व्या वर्षी तिने अखेरचा श्वास घेतला. नवाजुद्दीनचा भाऊ अयाझुद्दीन सिद्दीकी याने सायमाच्या निधनाचे वृत्त दिलं आहे.

त्याने दिलेल्या माहितीनुसार, बहिणीचं निधन झालं तेव्हा नवाजुद्दीन कामानिमित्त अमेरिकेत होता. सायमाला ब्रेस्टकॅन्सर असल्याचं नवाजुद्दीनने सोशल मीडियावर गेल्या वर्षी एक पोस्ट लिहित सांगितलं होतं.

उत्तरप्रदेशमधील बुढाणा इथं नवाजुद्दीनच्या गावी सायमाच्या पार्थिवावर रविवारी सकाळी आठ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येतील.

दरम्यान, गेल्या आठ वर्षांपासून सायमा ही कर्करोगाशी झुंज देत होती. अखेर पुण्यातल्या रुग्णालयात तिचं निधन झालं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

‘मी पुन्हा येईन’ या वाक्यात मी पणाचा दर्प नव्हता; देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार यांना पलटवार

लवकर फाशी होत नसले तर पोलिसांनी केलेले एन्काउंटर योग्यच- अण्णा हजारे

सोनी कंपनीने केला ‘हा’ नवा कॅमेरा लाॅँच

मारुती सुझुकीने कंपनीने परत मागवल्या तब्बल 63,493 गाड्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here