नवाब मलिकांचे देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप; पंकजा मुंडे म्हणल्या…

0
886

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते नवाब मलिक यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर ड्रग्स पेडलरसोबत संबंध असल्याचा गंभीर आरोप केला. यावरुन भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी नवाब मलिक यांच्यावर टीका केली आहे.

एका माजी मुख्यमंत्र्यांवर हा आरोप केला जात आहे. ज्या मुख्यमंत्र्यांनी राज्यात चांगले काम उभे केले, त्या मुख्यमंत्र्यांवर अशा प्रकारचा आरोप अत्यंत हास्यास्पद आहे. असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत. माध्यमांनी मुंडेंना प्रश्न विचारले असता, त्यांनी उत्तर देणे टाळले.

हे ही वाचा : “..म्हणून मी ईडीच्या चौकशीला सामोरे जातोय”

दरम्यान, मुंबईमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या आशीर्वादाने मुंबईमध्ये ड्रग्सचा व्यवसाय सुरू होता. या व्यवसायाला फडणवीसांचे संरक्षण होते, असं सांगतानाच ड्रग्स पेडलर असलेला जयदीप राणा हा सध्या तुरुंगात आहे. त्याचे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध आहे. महाराष्ट्रातील ड्रग्सच्या खेळाचे मास्टर माईंड हे देवेंद्र फडणवीस आहेत की काय अशी आम्हाला शंका आहे, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी – 

येत्या दोन वर्षांत शिवसेनेतील अनेक जण आमच्याकडे येतील; नारायण राणेंचा दावा

 एमआयएमचा बडा नेताराष्ट्रवादीच्या वाटेवर? ऑडिओ क्लिप व्हायरल; चर्चांना उधान

 शिवसेना नाशिकमध्ये एकहाती सत्ता स्थापित करेल; ‘या’ माजी मंत्र्याचा दावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here