मुंबई : भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा कोरोनासंदर्भातील माहिती देत एक व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ ट्विट करतानाच केशव उपाध्ये यांनी काही प्रश्न उपस्थित करत नवाब मलिक यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
नवाब मलिक हे आपल्याच तोंडाने आपल्याच अपयशाचे गोडवे गाण्यासाठी हिंमत लागते. चाचण्या वाढविल्यामुळे करोना संख्या वाढून सरकारची बदनामी होत असल्याचा सल्ला देणारे पत्रकार आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणारे राज्य सरकार असं एकाच दगडात दोन पक्षी मारणारे मलिक कुणाची बदनामी करत आहेत?
@nawabmalikncp आपल्याच तोंडाने आपल्याच अपयशाचे गोडवे गाण्यासाठी हिंमत लागते. चाचण्या वाढविल्यामुळे करोना संख्या वाढून सरकारची बदनामी होत असल्याचा सल्ला देणारे पत्रकार आणि त्यांच्या इशाऱ्यावर चालणारे राज्य सरकार असे एकाच दगडात दोन पक्षी मारणारे मलिक कुणाची बदनामी करत आहेत? ..२ pic.twitter.com/SODzHGCTKd
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 22, 2021
हा तर आपल्याच सरकारला दिलेला घरचा आहेर आहे. नवाब मलिक महाराष्ट्राचे कोरोनाचे आकडे कमी दिसावेत म्हणून टेस्ट कमी केल्याची लोकांची शंका जुनीच आहे. तुमचे हे वक्तव्य त्याची कबुली दिसते. खरे काय ते सांगा. उगाच पत्रकारांच्या मागे लपू नका. सरकार पत्रकार चालवतात का ? असा सवाल केशव उपाध्ये यांनी यावेळी उपस्थित केला.
महाराष्ट्रात देशांतील सर्वाधिक कोरोनामृत्यू झाले त्याचेही कारण संख्या कमी दिसण्यासाठी कमी केलेले टेस्टिंग आहे का? नवाब मलिक प्रकरण गंभीर आहे. मुख्यमंत्री महोदय उद्धव ठाकरे चौकशी करा., अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली.
महाराष्ट्रात देशांतील सर्वाधिक कोरोनामृत्यू झाले त्याचेही कारण संख्या कमी दिसण्यासाठी कमी केलेले टेस्टिंग आहे का? नवाब मलिक प्रकरण गंभीर आहे. मुख्यमंत्री महोदय @OfficeofUT चौकशी करा.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) May 22, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली- नाना पटोले
कोण रे बाबा तू सल्ला देणारा; निलेश राणेंचा रोहित पवारांवर हल्लाबोल
“…पर मुख्यमंत्री खाली हांथ गए और खाली हांथ आए”
कोरोना संकटात आरबीआयचे पैसे लसीकरणासाठी वापरा; रोहित पवारांचा केंद्राला सल्ला