Home महाराष्ट्र “नवनीत राणा तुमच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या”

“नवनीत राणा तुमच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या”

मुंबई : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांना मुंबई उच्च न्यायालयाने धक्का दिला आहे. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राबद्दल आक्षेप नोंदवत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने खासदार राणा यांचं जात प्रमाणपत्र रद्द केलं. यावर राष्ट्रवादी महिला प्रेदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. पण नवनीत राणा यांनी खोटे जातीचे प्रमाणपत्र सादर करून खासदारकी जिंकली. आज उच्च न्यायालयाने यावर जातीचे प्रमाणपत्र खोटे असल्याचा निकाल दिला आहे. नवनीत राणा खर तर रील लाईफ आणि रिअल लाईफ यामध्ये फार मोठा फरक आहे. अभिनय क्षेत्रामध्ये रिटेक वर रिटेक देवून एखादा सीन परफेक्ट करता येईल पण आमरावतीची जनता तुम्हाला रिटेकची संधी देणार नाही, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

नवनीत राणा यांच्या मध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी आता खासदारकीचा राजीनामा द्यावा आणि अभिनय क्षेत्रात पुन्हा नशीब आजमावून पाहावं, असंही रूपाली चाकणकरांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलेलं नाही”; मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रीया

किती हे असंवेदनशील सरकार; पुण्यातील मुळशी दुर्घटनेवरून भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका

“भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर ‘लेटर बॉम्ब’ टाकला, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला”

ठाकरे-मोदी भेटीत मराठा आरक्षणावर तोडगा नक्कीच निघेल- संजय राऊत