आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा: फेसबुक | ट्विटर | शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं जोरदार कंबर कसली असून पक्षात गेल्या काही दिवसांपासून जोरदार इनकमिंग सूरू आहे. अशातच आता राष्ट्रवादीने सत्ताधारी भाजपला मोठा धक्का दिला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. जयंत पाटील व विधानसभा विरोधी पक्षनेते मा. अजित दादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कुर्ला विधानसभा मतदारसंघातील अनेक भाजप पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
हे ही वाचा : “देवेंद्र फडणवीसजी, पत्रास कारण की…, मनसेचं पुन्हा एकदा फडणवीसांना पत्र
माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्या पुढाकाराने आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश संपन्न झाला. भाजपचे कुर्ला तालुका उपाध्यक्ष वैभव गाढवे, वॉर्ड उपाध्यक्ष रोहित ढिपळे, वॉर्ड सचिव यशवंत सुर्यांगण, आदिनाथ कोळेकर, विकास कदम, वैभव हाके, अनिकेत ढमाळ आदीसह इतर सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ हाती बांधले. पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी हा पक्षप्रवेश प्रभावी ठरेल, असा विश्वास प्रदेशाध्यक्षांनी व्यक्त करत सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी पक्षाचे मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे उपस्थित होते.
माजी आमदार मिलिंद कांबळे यांच्या पुढाकाराने आज मुंबई येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हा पक्षप्रवेश संपन्न झाला. भाजपचे कुर्ला तालुका उपाध्यक्ष वैभव गाढवे, वॉर्ड उपाध्यक्ष रोहित ढिपळे, वॉर्ड सचिव यशवंत सुर्यांगण, आदिनाथ कोळेकर, विकास कदम, वैभव हाके, pic.twitter.com/W6opK9z0dz
— NCP (@NCPspeaks) October 18, 2022
या पत्रकार परिषदेला माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश उपाध्यक्ष संजय खोडके, ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे, मुंबई विभागीय कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते महेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस नजिम मुल्ला, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले उपस्थित होते.
प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रवक्ते महेश चव्हाण, प्रदेश सरचिटणीस नजिम मुल्ला, मुंबई विभागीय युवक अध्यक्ष निलेश भोसले उपस्थित होते.
— NCP (@NCPspeaks) October 18, 2022
महत्त्वाच्या घडामोडी –
महाराष्ट्राच्या दुश्मनांना मशालीचा पहिला झटका बसलाय; ठाकरे गटाचा हल्लाबोल
मोठी बातमी! शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका; उपचारासाठी मुंबईला रवाना