आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
दापोली : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आतापासूनच मोठी खेळी खेळण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकांमध्ये विजय मिळवण्यासाठी इतर पक्षातील लोकांना पक्षात घेण्याचा राष्ट्रवादीने सपाटा सुरू केला आहे. मात्र सत्तेत सोबत असलेल्या काँग्रेस आणि शिवसेनेलाही राष्ट्रवादीने धक्का दिला आहे.
हे ही वाचा : संजय राऊत निम्मे डाॅक्टर, त्यांचं डोकं तपासावं लागेल; चंद्रकांत पाटलांचा पलटवार
दापोली नगरपंचायतीची निवडणूक काही महिन्यांवर होणार असताना राजकीय पक्षप्रवेशाचे कार्यक्रम जोरात सुरू आहेत. दापोली तालुका काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत तथा भाऊ मोहिते यांच्या मुलीने शनिवारी सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत सुतारवाडी येथे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने दापोलीत खळबळ उडाली आहे. या कार्यक्रमात शिवसेनेच्या दापोलीच्या नगराध्यक्षा परवीन शेख याही उपस्थित होत्या. त्यामुळे दापोली नगरपंचायत निवडणूक अधिकच रंगतदार होण्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे नगरसेवक सचिन जाधव यांनी काही दिवसांपूर्वीच नगरसेवक पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत पक्ष प्रवेश केला होता. शिवसेनेचे विधानसभा क्षेत्रअध्यक्ष संदीप राजपुरे यांनी राष्ट्रवादीत, तर राष्ट्रवादीच्या माजी सभापती व पंचायत समिती सदस्य ममता शिंदे यांनी पंचायत समिती सदस्य पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता.
महत्वाच्या घडामोडी –
भाजपचा ‘हा’ मोठा नेता तृणमूल काँग्रेसमध्ये करणार प्रवेश?; लवकरच ममता बॅनर्जींची भेट घेण्याची शक्यता”
महाधिक्त्याशी बोलेन, पण तुम्ही संप मागे घ्या; अनिल परब यांचं एसटी कामगारांना आवाहन
“कृषी कायदे मागे घेऊन पंतप्रधान मोदींनी मनाचा मोठेपणा दाखवला”