Pune News : क्राफ्टिझन फाउंडेशन यांच्या वतीने राष्ट्रीय पेटॅलिस्ट दिन उत्साहात साजरा

0
45

पुणे : पुण्यातील एन. एस. फडके सभागृह येथे क्राफ्टिझन फाउंडेशन यांच्या वतीने राष्ट्रीय पेटॅलिस्ट दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात पुणे व सातारा येथील भागीदार संस्था सहभागी झाल्या होत्या. एकूण ८ भागीदार संस्था आणि ४० पेक्षा अधिक बौद्धिक दिव्यांग व्यक्तींचा सक्रिय सहभाग लाभला.

कार्यक्रमादरम्यान विविध मनोरंजक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बौद्धिक दिव्यांग व्यक्तींनी या सर्व उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. त्यांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी चषक व सन्मानचिन्हांचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमात क्राफ्टिझन फाउंडेशनच्या तलशी, तसेच शिवरुद्र लुपने, रमण टेकाळे, भारत राहुट, प्रिया आणि सिद्धी आणि क्राफ्टिझन फाउंडेशनची संपूर्ण टीम सक्रियपणे सहभागी होती. क्राफ्टिझन फाउंडेशनच्या संचालिका श्रीमती मयुरा बालसुब्रमणियन यांनी पेटॅलिस्ट्स डे साजरा करण्याच्या कार्यक्रमासाठी व्हिडिओद्वारे संदेश दिला.

उपस्थित सर्व सहभागी दिव्यांग व्यक्तींनी व भागीदार संस्थांनी क्राफ्टिझन फाउंडेशन व बजाज यांचे उपजीविका कार्यक्रमासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल व प्रोत्साहनाबद्दल आभार व्यक्त केले. हा कार्यक्रम दिव्यांग व्यक्तींच्या सक्षमीकरणासाठी व त्यांच्यातील कौशल्यांना व्यासपीठ देण्यासाठी एक प्रेरणादायी उपक्रम ठरला. कार्यक्रमाच्या शेवटी क्राफ्टिझन फाउंडेशनच्या वतीने सर्वांना ‘राष्ट्रीय पेटॅलिस्ट दिनाच्या हार्दिक शुभेच्छा’ देण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here