नाथाभाऊंच्या प्रवेशाने महाविकास आघाडीची ताकद वाढेल- गुलाबराव पाटील

0
179

जळगाव : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचं राष्ट्रवादी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. यावर शिवसेना नेते  गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी आधीच सांगितलं होतं नाथाभाऊ भाजपला रामराम ठोकतील. आज अखेर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा कोणताही वाद नाही. त्यामुळे शिवसेनेला काहीही फरक पडणार नाही, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

दरम्यान, नाथाभाऊंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचे मी स्वागत करतो. त्यांच्या प्रवेशाने महाविकास आघाडीची ताकद वाढेल. तसेच नाथाभाऊ सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत, त्यामुळे जळगावमध्ये आम्ही हातात हात घालून काम करु, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

पक्ष सोडताना कुणाला तरी व्हिलन ठरवावं लागतं, खडसेंनी मला व्हिलन ठरवलं- देवेंद्र फडणवीस

यशाची शिखरं पादाक्रांत करताना पायाखालचे दगड का निसटतायतं याकडे लक्ष्य द्या; मुख्यमंत्र्यांचा भाजपला सल्ला

एकनाथ खडसेंच्या राजीनाम्यानंतर पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…

कांद्याचे दर वाढले म्हणून बोंबलू नका परवडत नसेल तर लसूण, मुळा खा- बच्चू कडू

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here