मुंबई : लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर करोना व्हायरसचा वाढता धोका लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केली. नरेंद्र मोदी यांना यावेळी मुख्यमंत्र्यांना करोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र रुग्णालयांची गरज असल्याचं सांगितलं. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना एक सल्ला दिला. आणि हा सल्ला नरेंद्र मोदींनीही लगेच मान्य केला.
सर्व धर्मगुरुंना मोठ्या कार्यक्रमाचं आयोजन करु नका असं सांगितलं पाहिजे तसंच सोशल डिस्टनस्गिंचं पालन करा अशी सूचना केली पाहिजे. असा सल्ला उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींनी दिला. नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंचा हा सल्ला मान्य करत लॉकडाउनदरम्यान लोकांचं मानसिक आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे याचं समर्थन केलं. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.
दरम्यान नरेंद्र मोदी यांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या. लॉकडाउनचा काळ संपला म्हणजे सगळं काही संपलं असं नसून ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून थंडी सुरु होते त्यामुळे विषाणूचा मुकाबला करण्याचे आव्हान आहे. असं नरेंद्र मोदीं म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी-
“पोलीस कर्मचाऱ्याचा कर्तव्य बजावताना मृत्यू झाल्यास 50 लाखांची मदत”
मोदी साहेब आपण पंतप्रधान आहात की एव्हेंट मॅनेजर- रुपाली चाकणकर
सांगली पोलिसांची कारवाई; आदेशाचं उल्लंघन करत सामूहिक नमाज पठण, 36 जण ताब्यात
वाटलं होतं चूल पेटवण्यासंबंधी बोलतील पण त्यांनी तर दिवा पेटवण्याचा उपदेश दिला- नवाब मलिक